शिरूर दिनांक ( वार्ताहर) बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे  बालाजी विश्व विद्यालयांमध्ये  शिवजयंती मोठ्या दिमाखात व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. 

 रामलिंग मंदिरापासून ते विद्यालयापर्यंत शिवस्फूर्तीची मशाल  विद्यार्थ्यांनी आणली. ढोल ताशांच्या व लेझीमच्या गजरात मशालीचे स्वागत करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून उत्साहाच्या वातावरणात आणि जयघोषात काढली .यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले... विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी सादर केला .शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. गीते गायली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वर्षा बांदल यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक  म्हसवडे उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर ,पालक शिक्षक संघाचे सदस्य दत्तात्रय कापरे , अशोक गुळादे यांच्या हस्ते छत्रपती  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी वक्तृत्व , निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धा झाल्यावर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंतीचे महत्त्व सांगितले. व विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता पोंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिता टेमगिरे यांनी विशेष प्रयत्न केले .स्वाती चत्तर यांनी आभार  मानले.