शिरूर –शंतनूभैय्या खांडरे आपल्या घरण्याची सराफी व्यवसायाची परंपरा यशस्वीपणे पुढे नेत असून भव्य दुमजली असे सोन्या चांदीचे सुवर्णालंकाराचे दुकान त्यांनी सुरु केले असल्याचे सांगून त्याच्या व्यवसायिक कार्यकिर्दीसाठी शुभेच्छा प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे माजी स्भागृहनेते प्रकाश धारीवाल यांनी दिल्या . एस.के. खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स , सुभाष चौक या दुकानाचे उद्घघाटन शिरूर नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश रसिकलाल धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले . आमदार ॲड अशोक पवार ,पारनेरचे आमदार नीलेश लंके , ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , माजी नगरसेवक विजय दुगड यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी , विविध संस्था संघटना याचे प्रतिनिधी , व्यापारी यांनी या सुवर्णदालनास भेट दिली . यावेळी शंतनूभैय्या सुरेश खांडरे म्हणाले की शिरुर शहरातील सर्वात मोठे सुवर्णदालन व सर्वात कमी मजुरी ही या सुवर्णदालनाची वैशिष्ट्ये आहे . खांडरे या प्रख्यात सुवर्ण पेढीची २०० वर्षाहून अधिक वर्षाची विश्वासार्ह परंपरा आहे. पहिली पिढी चिन्न्पा कंडूजी खांडरे सराफ दुसरी पिढी काशिनाथ चिन्नपा खांडरे सराफ , तिसरी पिढी सदाशिव काशिनाथ खांडरे सराफ व चौथी पिढी सतिश सदाशिव खांडरे व सुरेश सदाशिव खांडरे व पाचवी पिढी शंतनू सुरेश खांडरे अश्या पाच पिढ्या या सुवर्ण पेढीत घडल्या . सुभाष चौकात दुमजली इमारतीत हे नविन सुवर्णदालन सुरु करण्यात आले असून या ठिकाणी मनमोहक व कलाकुसरीचे दागिने आधुनिक हॉलमार्क प्रमाणित दागिने उपलब्ध असल्याचे खांडरे यांनी सांगितले. उद्घघाटना निमित्त सुवर्णदालनास आकर्षक अशी विद्युतरोषणाई करण्यात आली होती . यावेळी उपस्थितांचे स्वागत माजी उपनगराध्यक्षा अलका सुरेश खांडरे , नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सतीश खांडरे , व्यवसायिक सुरेश खांडरे यांनी केले सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले .