बीड — वडवणी येथे कापूस व्यापार्‍याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील 51 लाखांची रोख रक्कम लंपास करणारी चोरट्यांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले. या प्रकरणात सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 41 लाख रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे .

शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे वय 21 वर्ष रा.गोपाळपुरा, ता.धारुर, बालाजी महादेव पुरी वय 21 वर्ष. रा.भवानी माळ ता.केज, गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर वय 33, रा.बाराभाई गल्ली, केज, सुर्यकांत लक्ष्मण जाधव रा.केज, करण विलास हजारे वय 20 रा.केज, बालाजी रामेश्वर मैंद वय 20 रा.गोपाळपुरा संदिप वायबसे अशी आरोपींची नावे असून यातील संदीप वायबसे वगळता इतर 6 आरोपींना पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून कापूस व्यापार्‍याचे चोरलेले 51 लाखांपैकी 41 लाख रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे. फरार आरोपीकडे उर्वरित दहा लाखांची रक्कम असल्याचा संशय आहे .अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. शामसुंदर आण्णासाहेब लांडे रा. घाटसावळी ता.जि.बीड हे कापूस व्यापारी आहेत. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास केज येथील माऊली जिनींगमध्ये 760 क्विंटल कापूस विक्री करुन त्याची 51 लाखांची रक्कम घेवून चिंचवण मार्गे ते दुचाकीवरुन वडवणी येथे आले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन अज्ञातांनी रस्त्यात अडवले. त्यांच्या मागोमाग एक स्विप्ट कार जवळ आली. त्यातून तोंड बांधलेले आणखी तीन इसम व्यापारी शामसुंदर लांडे यांच्याजवळ आले. त्यांनी लाकडी काठी लाथाबुक्क्याने मारहाण करत त्यांच्याकडील पैशानी भरलेली सॅग व दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवलेल्या गोणीमधील पैसे बळजबरीने हिसकावून चोरुन नेले होते.

या प्रकरणी लांडे यांच्या तक्रारीवरुन वडवणी ठाण्यात 8 फेब्रुवारी रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थागुशाचे पथक केज, धारुर, तेलगाव,दिंद्रुड,सिरसाळा,

आडस परिसरातील गुन्हेगारांचा शोध घेत होते.हा गुन्हा हा मैंद ता.केज गावातील टोळीप्रमुख बालाजी महादेव पुरी 21 वर्ष रा.भवानी माळ ता.केज याने त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केला असून त्यापैकी तीन जण हे आडस रोड परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने जुना आडस रोड परिसरात सापळा लावून शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे, बालाजी महादेव पुरी व गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा माऊली जिनींगमधील मार्केट कमिटीचा कामगार सुर्यकांत लक्ष्मण जाधव याच्या मदतीने करण विलास हजारे, बालाजी रामेश्वर मैंद, संदिप वायबसे यांनी मिळून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोह. कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, पोह. रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, पोशि. बप्पा घोडके, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, पोह. रविंद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी

केली.