बीड/माजलगाव 

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव येथे शहर पोलीस ठाणे हद्दीत एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि.२५ मार्च २०२१ ते दि.२८ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणात आरोपीने पिडितेला जातीवाचक शिवीगाळ करून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संजय आसाराम राजुरकर (रा.सेलु जि.परभणी) याच्याविरुध्द दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

    बीड शहरात एका लॉज वरती एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली त्या पाठोपाठ बीड शहरातील बीड भागात एका मुलीवर लैंगिक खेळ झाल्याची घटना आणि त्यानंतर केज या ठिकाणी देखील अशीच एक घटना घडली आणि आज माजलगाव या ठिकाणी देखील एक घटना महिला अत्याचाराची घडली यामुळे महिलांवर वाढते अत्याचार हे रोखण्यात पोलिसांना अपयश आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय अशा नराधरांच्या विरोधात नुसते गुन्हे दाखल करून नव्हे तर असे नीलाज रे करते घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व पोलिसांची जरब बसावी अशी अपेक्षा जनतेतून होत आहे