शिरुर दिनांक ( वार्ताहर ) ' स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे प्रयिपादन वेल्हाचे गटविकास आधिकारी महेश पांढरे यांनी केले . चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने 'स्पर्धा परीक्षेची तयारी' या विषयावर गटविकास अधिकारी पांढरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पांढरे यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरुप व विविध विषयासंदर्भातील अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती दिली . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के .सी. मोहिते होते. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणते व या ज्ञानाचा उपयोग इतर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी होतो असे प्रतिपादन केले. प्रा. कवादे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. काळे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. चाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.