रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावास राखी बांधून आयुष्भर स्वतःचे रक्षण करण्यासाठी भावाकडून घेतलेली हमी.

परंतु खऱ्या अर्थाने या भारत देशाचे संविधान हाच आपला रक्षण करता मोठा भाऊ असून त्याचे पूजन करून आणि त्याला राखी बांधत आगळ्या वेगळ्या पद्धतीने संतुलन संस्थेमध्ये आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. 

   संविधानाचे पूजन व औक्षण करून त्यास राखी बांधून महिला भगिनी व विद्यार्थी यांनी स्वतः बरोबर देश रक्षणासाठी प्रार्थना केली.राखी बांधून संविधानास देश संविधानाच्या हाती म्हणत आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधनाचा पवित्र सण गुरूवारी साजरा केला. महिलांनी पारंपारिक पद्धतीबरोबरच आजच्या आधुनिक पद्धतीने देश सेवेची जबाबदारी ओळखून आपले कार्य करावे, तसेच या वर्षी अमृत महोत्सव साजरा करतांना हर घर तिरंगा बरोबरच हर घर संविधान सुद्धा महत्वाचे आहे. असे संतुलन संस्थेचे संस्थापक अॅड बी.एम.रेगे यांनी मत मांडले. त्याच्या संकल्पनेतून आणि संचालिका अॅड. पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनातून दगडखाण आणि कष्टकरी कामगारांच्या शुभहस्ते संतुलन भवन, तुळजाभवानीनगर येथे साजरा करण्यात आला.  

    यावेळी दगडखाण कामगार परिषदेचे पदाधिकारी, संतुलन पतसंस्था, संतुलन महिला कष्टकरी परिषद, संतुलन पाषाण शाळा शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.