शिरुर : शिवसेनेचे  युवा नेते अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांचा युवा संवाद दौरा शिरूर तालुक्यात पार पडला. या दौ-यात शिवाजीराव आढळराव यांना खासदार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला .

 युवा संवाद दौऱ्याची सुरुवात कवठे येमाई पासून झाली त्यानंतर मलठण, सोने सांगवी, रांजणगाव, कारेगाव, अण्णापूर आणि सांगता सभा शिरूर या ठिकाणी संपन्न झाली.

यावेळी बोलताना अक्षय आढळराव पाटील म्हणाले की, शिवाजीदादा खासदार नसतानाही त्यांनी शिरुर तालुका आणि शिरुर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रस्तावित पुणे नगर एलिव्हेटेट महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते, विजेचे प्रश्न, विविध गावातील ग्रामपंचायत इमारती, जिल्हा परिषद शाळांचा सामाजिक सभागृह, महिला अस्मिता भवन, यांसह पाणी पुरवठा योजना व अन्यविकासकामे  यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेचून आणत अनेक विकासकामे पूर्णत्वास आणली आहेत. यावेळी शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अर्चना सोनवणे व राजेंद्र सोनवणे यांचा अक्षय आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये  शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झाला .

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे शिरूर शहरात किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धेचे बक्षीस वितरण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप अक्षय आढळराव  यांच्या हस्ते करण्यात आले. या युवासंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आढळराव यांच्या समवेत  युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेना शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शिरूर शहरप्रमुख मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, उद्योग आघाडी जिल्हाप्रमुख अभिजीत बत्ते, विद्यार्थी सेनेचे संग्राम शिंदे, युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, युवासेना समन्वयक गोवर्धन पाचंगे, आकाश ढाकणे, उपतालुकाप्रमुख सुदाम चव्हाण, उपशहर प्रमुख सागर गव्हाणे, अंकुश शेवाळे, आकाश मोरडे यांच्यासह शिरूर शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते