शिरुर  :  न्यू इंग्लिश स्कूल शिरुर रयत शाळेतील शिक्षीका जयश्री संजय कडेकर या २५ वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्या . कडेकर या माजी उपनगराध्यक्षा रत्नप्रभा कडेकर यांच्या स्नुषा असून एस . टी . महामंडळातील सेवानिवृत्त आधिकारी संजय कडेकर यांच्या पत्नी आहेत . त्याच्या सेवानिवृत्ती निमित्त रयत शाळेत त्यांच्या विशेष सन्मान करण्यात आला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सलिंग सदस्य व माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान शहिदखान पठाण ,माजी उपनगराध्यक्ष संतोष कडेकर , शिवसेवा मंडळाचे विश्वस्त मनसुख गुगळे , मुख्याध्यापक संजय मचाले , माजी मुख्याध्यापिका अस्मिता अजित डोंगरे , संजय कडेकर ,पर्यवेक्षक जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते . कडेकर या कॉमर्स व अर्थशास्त्र या विषयाचा विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षीका म्हणुन प्रसिध्द आहेत त्यांनी पोलादपूर ,जि .रायगड येथे ५ वर्ष व शिरुर येथे २० वर्ष शिक्षक म्हणुन कार्यरत होत्या . यावेळी बोलताना पठाण म्हणाले की कडेकर यांनी अनेक विद्यार्थ्यांचा जीवनाला शिक्षणादवारे आकार दिला . कडेकर कुटुंब शिरुर परिसरातील राजकीय , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणारे आहे. कडेकर यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे पठाण म्हणाले . यावेळी संजय मचाले ,  सायली कडेकर अस्मिता डोंगरे ,संतोष डोके , गावित्रे मॅडम आदीनी ही मनोगते व्यक्त केली . सत्काराला उत्तर देताना कडेकर यांनी आपले २५ वर्षातील शिक्षकी जीवनातील अनुभव सांगून काम करीत असताना केलेल्या सहकार्याविषयी सर्वानविषयी कृतज्ञता व्यक्त केली .सूत्रसंचालन  थिटे मॅडम यांनी केले . तर आभार इसवे यांनी मानले.