जळगाव | मोहाडी-धानोरा-लमांजन-म्हसावद रस्त्याचे भूमीपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 2 कोटी 30 लक्ष किमतीचा हा रस्ता दोन टप्प्यात होणार असून म्हसावद येथे रस्त्यावर वारंवार पाणी साचत असल्यामुळे रस्ता दुरुस्ती करून देखील खराब होत होता. परिणामी या रस्त्याचे 50 मीटर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था विकासचे संचालक रमेश आप्पा पाटील,सरपंच गोविंद भाऊ पवार, माजी सभापती बापू पवार, माजी उपसभापती समाधान चिंचोरे, माजी उपसरपंच शितलबाई चिंचोरे, हौशीलाल भोई, महेंद्र राजपूत, श्री. खोडपे यांसह गावकरी उपस्थित होते. गावातील मुख्य रस्त्यावरती पाणी साचत असल्यामुळे यात 50 मीटर रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार असून उर्वरित रस्ता हा डांबरीकरण करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.