शिरुर : चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात युवा सप्ताह निमित्त व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विचारवेध संस्था पुणे व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी म्हणाले की आयसीएस परीक्षा पास होऊन सुध्दा सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सरकारची चाकरी न करता देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.आजाद हिंद फौज उभी केली.हिंदू मुस्लिम भेद होणार यासाठी ते सदैव दक्ष रहात. याचे अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले.जय हिंद' चा नारा सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ .राजाभाऊ भैलुमे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.के.सी. मोहिते यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या त्यागाची, जिद्दीची आज तरुणांना गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ .विकास नायकवडी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ .क्रांती गोसावी- पैठणकर यांनी केले.