अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती - अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरातील शहर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील वसंत चौक, बडनेरा हद्दीतील आठवडी बाजार व फ्रेजलपुरापोलीस ठाण्याहद्दीतील चपराशीपुरा येथे सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकली. या कारवाईत 16 जुगाऱ्याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 55 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र शहर कोतवाली पोलीस ठाण्याहद्दीतील वसंत चौक , फ्रेजलपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील चपराशी पुरा येथे जुगार चालविणारे अनुक्रमे आलोक श्रीवास, व रियाज खान हयात खान हे पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाच्या हाती लागले नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
स्थानिक वसंत चौक येथे आलोक श्रीवास याने जुगार भारविल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पोलीस पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने तेथील जुगारावर धाड टाकली.या कारवाईत अर्षद खान नसीर खान ( 19, यास्मिन नगर), रोहित संतोष लोहकरे ( 25, यशोदा नगर), राहुल लक्ष्मण लोणारे (28, बेलपुरा), जय प्रकाश विजय शर्मा (38, शोभा नगर), विलास भास्कर बोरकर(42, गोपाल नगर), मौसीन शाहा युसूफ शाहा(33, ताज नगर), वचन कृष्णराव माहुरकर(42, गायत्री नगर) यांना अटक करून त्यांच्याकडून 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच पथकाने बडनेरा पोलीस ठाण्याहद्दीतील आठवडी बाजार येथील जुगारावर धाड टाकून कारवाई करण्यात आली या कारवाईत हिरा रामाजी रोकडे(50, नवी वस्ती बडनेरा), फैमोद्दीन इस्लामोद्दीन(50,मोबिनपुरा, बडनेरा), शेख लतीफ शेख नासिर(38,आठवडी बाजार,बडनेरा), ज्ञानेश्वर अण्णाजी तिडके(55,टीमताला), शेख इमरान शेख इब्राहिम(22,इंदिरा नगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 17हजार480रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्याविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुगार कुणाचा ते ज्ञात, "तो" गायब...
चपराशी पुरा परिसरातील शुक्रवारी बाजारात रियाज खान हयात खान हा जुगार चालवत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्या आधारे विशेष पोलीस पथकाने 18 जानेवारी रोजी सायंकाळी च्या दरम्यान जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली.मात्र रियाजखान हयात खान पोलिसांच्या हाती आला नाही. या कारवाईत मनोहर प्यारेलाल गौर(62,परतवाडा), सुनील नंदकिशोर गोदली (32,चपराशी पुरा), जगन बबन सारकटे(34,परिहारपुरा), राहुल दिवाकर बोके(41,रुख्मिणी नगर) यांना अटक करून त्यांच्याकडून 20हजार640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांवरुद्धफ्रेजलपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस याआयुक्त यांनी स्थापित केलेल्या विशेष पोलीस पथकाने केली आहे. तर पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमालू यांच्या नेतृत्वात करण्यात आली.