शिरुर  हेलिंग लाईव्हस या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २१ जानेवारी 2024 रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून भारताची सुवर्णकन्या, स्वर्ण पदक विजेती, 400 मीटर धाव मध्ये जागतिक रेकॉर्ड नोंदवणारी भारताची धावपटू, अर्जुन अवॉर्ड हिमा दास उपस्थित राहणार आहे . यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . पत्रकार परिषदेस संतोष सांबारे, सुनील पडवळ, स्वप्नील फलके, विजय पाचंगे,विवेकानंद फंड, अमृता फलके, सुजय पाचंगे, ओमकार सरोदे आदी उपस्थित होते . सांबारे यांनी यावेळी सांगितले की हेलिंग लाईव्हस या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था चार देशांमध्ये आणि भारतात सात राज्यांमध्ये काम करत असून या संस्थेने 21 जानेवारी 2024 ला रांजणगाव एमआयडीसी मध्ये मॅरेथॉनचे आयोजन केले आहे .यावेळी भारताची धावपटू, अर्जुन अवॉर्ड सन्मानित, हिमा दास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .