हिंगणघाट शहरातील इंदिरा गांधी वार्डातील पाण्याच्या टाकी जवळ ९ जानेवारी मामा भाच्याचा किरकोळ वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारी झाली या वादात भाच्याने मामाच्या डोक्यावर विट मारु गंभीर जखमी केले. दरम्यान भाच्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची खोटी माहिती दिली .मात्र जखमी मामाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.या ठिकाणी सुध्दा भाच्याने खोटी माहिती देत दिशाभूल केली सेवाग्राम येथे सुद्धा प्रकृती नाजूक असल्याने पुढील उपचाराकरिता त्यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान दाखले केले असता दोन दिवसांनी जखमी प्रकाश मसराम यांचा १३ जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.मात्र भाचा खुशाल राजू तुमडाम याने हानामारीत विट मारल्याची कोण्हालाही माहिती दिली नाही. जेव्हा भाचा खुशाल याने मामा प्रकाश याच्या डोक्यावर विट मारल्याची घटना मृत्यक प्रकाश याच्या मुलाने पाहिली होती. मात्र या घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी खुशाल राजु तुमडाम ने दिली होती यामुळे या घटनेची माहिती मुलाने कोण्हालाही दिली नाही. शेवटी मुलाने हा घटनाक्रम आपल्या आईला सांगितला यावेळी मृत्यकाची पत्नी श्रीमती कांताबाई प्रकाश मसराम हिने यासंबंधी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी खुशाल राजू तुमडाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली घटनेची गांभीर्य पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली उपविभागीय पोलिह अधिकारी रोशन पंडीत याच्या निर्देशनात पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिश्रा हिंगणघाट डि.बी प्रमुख प्रविन देशमुख आणि पथकानी कारवाई केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं