शिरुर :  भूगोलाचा अभ्यास करणे म्हणजे एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे इतकेच नव्हे तर समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम भूगोल करताना दिसत आहे. भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. किंव्हा पृथ्वीचे वर्णन असा होतो. भूगोल म्हणजे ग्रीक विचारवंत इरटोस्थेणीस याने पृथ्वीचे वर्णन करणारे शास्र असे केले. तर या शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. भूगोलाच्या अभ्यासावर प्रामुख्याने चार पारंपारिक विचार प्रभाव टाकताना दिसून येतात. 1. नैसर्गिक आणि मानवी क्रिया 2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास 3. मानव आणि पृथ्वी यांचा सहसंबंध 4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्रामध्ये आणि नकाशातंत्रात पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. भूगोला विषयाचा अभ्यास हा प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये केलेला आढळते. सर्वप्रथम ग्रीकांनी भूगोल अभ्यास करायला सुरवात केली. ग्रीकांनी शास्त्र व तत्त्वज्ञान म्हणून भूगोलाचा अभ्यास केला आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे या विषयी वर्णने केली. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अॅकरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅटोस्थेसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), इब्न बतूत, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली. भूगोलाच्या पुढे प्रामुख्याने दोन शाखा रूपाने अभ्यासास आल्या मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल. मानवाचा भूगोल लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी आणि परस्परांशी त्यांचे स्थान आणि स्थान यांच्याशी आणि त्यातील संबंधांचा अभ्यास करून अभ्यासाशी संबंधित आहे. भौतिक भौगोलिक वातावरण, हायड्रोस्फीअर, बायोस्फीअर आणि भूगोल यासारख्या नैसर्गिक वातावरणामधील प्रक्रिया आणि नमुन्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी अनेक नवीन प्रदेशांचा शोध लावला. फिरत असताना त्यांनी त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार केले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डीला ब्लैंश यांनी योगदान दिले. गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात Geomatics आणि इतर संबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. असे म्हणतात की भूगोल इतिहास घडवतो आणि या इतिहासाचा भूगोल भागीदारही असतो. या प्रमणे नसर्गिक व मानवनिर्मित वस्तूंची देवाणघेवाण, देशात आणि देशाबाहेर होऊ लागते. त्यातून नागरीकरणाला आणि स्थलांतराला सुरुवात होते. भाषा, संस्कृती, साहित्य, कला यांचा उदय होतो. भारताचेही तसेच झाले. जेम्स रेनेल यांना भारतीय भूगोलाचे जनक म्हटले जाते, त्यांना महासागरशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. कारण त्यांनी समुद्र विषयी जास्त अभ्यास केलेला आहे, भारतीय भूगोल तज्ञ कोण आहे.डॉ.सी.डी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ 14 जानेवारी या दिवशी जन्मदिन म्हणून भूगोल दिन साजरा केला जातो. डॉ.सी.डी. देशपांडे हे एक शिक्षक, शिक्षणतज्ञ , लेखक, व भूगोल तज्ञ होते. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1912 रोजी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे असे होते. त्यांनी भूगोल या विषयाला शास्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतातील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरवली पर्वताची रांग आहे. अरवली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरवलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला , समुद्री किनाऱ्याला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे. भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे. भूगोलाच्या अभ्य्साचे महत्व – भूगोल अभ्यासात आर्थिक, वैद्यकीय, हवामान, वनस्पती या घटकांचा एकमेकांच्या वर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडताना दिसून येतो. भूगोल या विषयाचा मानव, मानवेतर प्राणी म्हणजे सजीव प्राणी या सर्व घटकांची अत्यंत जवळचा आणि निगडी चा सहसंबंध येतो. मानव मानवाच्या गरजा यामध्ये प्रामुख्याने मानवाच्या प्रमुख गरजा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता ही भौगोलिक घटकांच्या वर अवलंबून असते, मानवी आरोग्य आणि नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास सुद्धा भूगोलात केला जातो. नैसर्गिक संसाधने मानव मानवी वसाहती यांचा देखील अत्यंत जवळचा सहसंबंध आहे. या सर्व घटकांचा सहसंबंध भूगोलाशी आहे. मानव मानवाचे व्यवसाय पायाभूत सुविधा रस्ते रेल्वे वाहतूक पाणीपुरवठा बाजारपेठा हवाई मार्ग या सर्व घटकांचा भौगोलिक घटकाशी सहसंबंध आहे ज्या ठिकाणी भौगोलिक घटक अनुकूल आहेत त्याच ठिकाणी या सर्व सुविधा विकसित झालेल्या पहावयास मिळतात तसेच मानवी व्यवसाय आणि मानवी व्यवसायांचे वर्गीकरण हे भौगोलिक घटकावर अवलंबून आहे मानवी व्यवसाय विकसित व्हायचे असेल तर भौगोलिक घटक हे अनुकूल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भूगोलाचे प्रामुख्याने संपूर्ण जगामधील अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान असताना दिसून येते. यामध्ये पाहिले तर ज्या देशांना चांगली उत्कृष्ट अशा रीतीने भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे म्हणजेच प्राकृतिक रचना, हवामान, मृदा आणि इतर घटक या सर्व घटकांचा विकासावरती परिणाम होतो. अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. म्हणूनच असं आपणाला दिसून येते की विकसित देश जे विकसित होतात किंवा ते विकसित का झाले याच्या पाठीमागे भौगोलिक घटक, भौगोलिक रचना ही असलेली आपणास पहावयास भेटते उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान या देशांना समुद्रकिनारे लाभलेले नसल्यामुळे या देशांचा विकास कमी झालेला पहावयास मिळतो म्हणजेच हे खंडांतर्गत देश असे आपणास पाहावयास भेटते, म्हणजेच समुद्रकिनारा लाभलेला नाही त्या ठिकाणी सर्वात स्वस्त वाहतूक त्या देशांना प्राप्त झालेली नाही आणि ज्या देशांना सर्वात स्वस्त वाहतूक प्राप्त झालेले असते हे भौगोलिक घटकांचाच भाग आहे म्हणजेच त्याचे उत्तम उदाहरण जर पाहायचं झालं तर विकसित देश या विकसित देशांमधलं जपान या देशाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. अतिशय कमी क्षेत्रफळाने असलेला देश परंतु विकसित देश म्हणून याकडे पाहिले जाते म्हणजेच याचा अर्थ की भौगोलिक घटक अनुकूल आहे सागर किनारे किंवा महासागर अटॅच असल्यामुळे त्या ठिकाणी जल वाहतूक ही उपलब्ध होते, म्हणूनच असं म्हणता येते की भौगोलिक घटक आणि अर्थव्यवस्था भौगोलिक घटक आणि विकास यांचा अत्यंत जवळचा सहसंबंध आहे. म्हणून सद्यस्थितीला जर पाहिलं तर भारताची भौगोलिक रचना ही अत्यंत चांगली आहे म्हणजेच तीन बाजूने समुद्रकिनारा लाभलेला आहे याचा फायदा भारत देश घेताना दिसून येत आहे. भौगोलिक घटकांचा संस्कृती वरती देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो म्हणजेच भारतीय संस्कृती याचा प्रामुख्याने विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पेहराव संस्कृती वेगवेगळे आहार, संस्कृती, वेगवेगळी भाषा संस्कृती ह्या मध्ये विविधता असलेली पहावयास भेटते म्हणजेच एकूणच जगामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक राजकीय सर्व घटक विकसित व्हायचे असेल तर प्राकृतिक रचना, भौगोलिक घटक यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे असे या ठिकाणी नमूद करावं असे वाटते. सद्यस्थितीमध्ये पाहिले तर एकेकाळी असं म्हटलं जात होतं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत असे म्हणजेच काय की त्याकाळी भारतात देशांमध्ये शेती व्यवस्था किंवा सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर भारतातील 70 टक्के लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून असलेली पहावयास भेटते आणि हे 70 टक्के लोकसंख्या आणि शेती क्षेत्र हे भौगोलिक घटकावर अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भौलिक घटकांचा अभ्यास केला त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यास शक्य झाले असावे असे माझे मत आहे. संपूर्ण भारत देशाचे भौगोलिक घटक सर्वत्र सारखे नाही त्यामुळे त्यांनी देखील भौगोलिक घटकांचा विचार करून केंद्र आणि राज्य याविषयी संविधानात वेगळ्या तरतुदी केल्या असाव्यात असे माझे मत आहे. त्यामुळेच आपल्या देशाचे संविधान आजपर्यत टिकून आहे. म्हणूनच की भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये पाहिले तर भौगोलिक घटकांना अत्यंत महत्त्व आहे. भूगोलात नवीन तंत्र विकास झालेला पहावयास भेटतो. जिओ इन्फॉर्मेटिक्स हा एक चांगला वाढणारा उद्योग आहे, जगभरातील बहुतेक देश या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त करतात. रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (GIS) क्षेत्रात कुशल मानव संसाधनाच्या कमतरतेबद्दल भारताच्या चिंतेचा प्रश्न आहे जेणेकरून विद्यार्थी हे हॉटस्पॉट करिअर करू शकतील. भारतात जिओ इन्फॉर्मेटिक्सचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. वेगवान वाढ आणि विकासाच्या शक्यतांसह जिओइन्फर्मेटिक्स क्षेत्रात उच्च स्तरीय वाव. गेल्या पंचवीस वर्षांत भारतात रिमोट सेन्सिंग विकसित झाले आहे. हे कृषी, वनीकरण, पायाभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापन, सिंचन, संरक्षण आणि वाहतूक व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहे. भू-माहितीशास्त्र हे एक असे विज्ञान आहे जे भूविज्ञान आणि संबंधित शाखांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहिती विज्ञान पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरत आहे. अशाप्रकारे अशाप्रकारे भारतीय ज्ञान प्रणाली बद्दल काही विश्लेषण करता येईल.

लेखन :- प्रा . डॉ .नीलेश काळे ,

मो - 7350425570

सहाय्यक प्राध्यापक,

भूगोल विभाग ,टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी ,पुणे .