पाऊस पडला थेंबभर, लाईट गेली रातभर

"महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर'

पाचोड (विजय चिडे) हवामान विभागाने नुकताच ९ व १० जानेवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्या अनुषंगाने या दोन्ही दिवशी पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीबोडखा,केकत जळगाव, सानपवाडी या गावात दुपार पासून तर सायंकाळ पर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, यामुळे तूर, ज्वारी ,हरभरा,गहू ,कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाचोडसह परिसरात पाऊस पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.थेट दुपारी चार वाजता लाईट गायब झाले की दुसर्याच्या दिवशी‌ सकाळीच लाईट येत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी महावितरण विरोधात शिमगा करत “पाऊस पडला थेंब भर, लाईट गेली रात भर” असे म्हणत बोंब ठोकली आहे, तसेच महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.