आष्टी(प्रतिनिधी)भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने भारतभर सुरू असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे.प्रशासकीय स्तरावरुन देखील याचे मोठ्या प्रमाणात ब्रँन्डिंग सुरू आहे.सर्व प्रशासकीय यंत्रणा यात आपले योगदान देताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डोंगरगण येथे हर घर तिरंगा अभियान आंतरगत जोरदार तयारी करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत डोंगरगण यांच्यावतीने ध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये ग्रामपंचायत च्या वतीने झेंडे वितरित केले. याला डोंगरगण ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले यावेळी तलाठी बोरुडे साहेब ,कृषी अधिकारी सातपुते साहेब , ग्रामविकास अधिकारी लोंढे साहेब, सरपंच दत्ता चव्हाण , उपसरपंच मयुर चव्हाण,ग्रा.पं सदस्य माऊली वाघ ,परमेश्वर कर्डिले ,नवनाथ कांबळे, बारीकराव चव्हाण ,नाना शिंदे, गणेश हारकर, अंबादास धोंडे,दिलीप नरवडे , आरोग्य विभागाच्या यलोरे मॅडम,पठाण सिस्टर,आशा वर्कर आशु ताकतरे ,जि.प. शाळेचे मुख्याध्यापक बोंडगे सर ,कोल्हे सर,चव्हाण सर ,वाळके सर, रोडेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक ससाणे सर,शिंदे सर ससाने एस आर सर,वाघ सर ,हजारे सर ,गावडे सर बनसोडे सर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.