बीड | प्रतिनिधी.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात "आझादी गौरव पदयात्रा" निघालेली असुन दि.०९ ऑगस्ट पासुन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू असलेल्या या पदयात्रेचा समारोप १४ ऑगस्ट रोजी, बीड तालुक्यातील घोडका राजुरी, या ठिकाणी होत आहे. १४ तारखेला दुपारी ०३ वाजता केज मार्गे येळंब घाट, नेकनुर, मांजरसुंबा, पाली मार्गे ही पदयात्रा दुपारी ५ वाजता बार्शी नाका येथे येत असुन, बार्शी नाका, तेलगव नाका ते पुढे घोडका राजुरी येथे या यात्रेचा समारोप होत आहे. या पदयात्रेत विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांचा प्रवेश, गाव तिथे शाखा अभियान, स्वतंत्र सैनिकांचा सन्मान सोहळा इत्यादीसह महागाईवर पथनाट्य आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी बीड तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमास खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, आ.धीरज देशमुख, युवा नेते आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक देविदासजी भन्साळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे. तालुक्यातील स्वांतंत्र्य सैनिकांचा सन्मान याठिकाणी आपण करत असुण चुकून कोणाचा संपर्क झाला नसेल तर कृपया तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील मो.९४२१२८१०१२ या नंबर वरती संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.