श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

कन्नड : 

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु श्रीरामांच्या नूतन बालमुर्ती नवनिर्मीत श्रीराम मंदीरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या निमीत्ताने कन्नड शहरात अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलश यात्रेचे आयोजन सकल हिंदू धर्मियांकडून करण्यात आले होते.

           या मिरवणुकीत शहरातील अबाल- वृद्ध महिला- पुरुष मोठ्या प्रमाणावर उत्साहाने सामील झाले होते.सर्व प्रथम सर्व मान्यवरांकडून कलशाचे पुजन करण्यात आली. कलश यात्रा हिवरखेडा रोड वरिल साई मंदीर , हिवरखेडा रोड,४०गाव रोड , पिशोर नाका, टेलीफोन ऑफीस मार्गे विवेकानंद कॉलनी पिशोर रोड येथील राममंदिरात आली. 

          या कलश यात्रेत तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन आनंदाने नृत्य केले, फुगड्या खेळल्या , प्रभु श्रीराम ,माता सीता व हनुमानाच्या वेषभुषेत लहान मुले आली होती. प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. अबाल-वृद्धांनी गाण्यावर ठेका धरला होता.कलश यात्रेच्या रस्त्यावर रांगोळी काढून शुशोभीकरण करण्यात आले होते. ठिकठिकाणी रथातील कलशाचे पुजन करण्यात येत होते. तर पिण्याचे पाणी,चहापान वाटप करण्यात आले. पुष्पवृष्टी करण्यात आली.

               कलश यात्रेची सांगता विवेकानंद कॉलनी येथील श्रीराम मंदीरात कलश पुजनाने , १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान काय करायचे तसेच दि.२र जानेवारी रोजी दिवाळी साजरी करावी या आवाहानाने व श्रीरामाच्या आरतीने संपन्न झाली. या कलश यात्रे मध्ये तालुक्यातील सर्व श्रीराम सेवक व विविध राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.