मित्र नगर, पालवण चौक येथे आयोजित केलेल्या शिबिरातून नागरिकांनी घेतला लाभ
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बीड दि.०३ (प्रतिनिधी) देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढून घेण्याचे आवाहन माजी सभापती विनोद मुळूक यांनी केले आहे.
मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. एबीवाय योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाही संबोधले जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील मागास प्रवर्गातील कुटूंबांना प्रतिवर्ष ०५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे. आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड च्या माध्यमातून ०५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जातात. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच हे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड मिळते. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक गरीब आणि मागास प्रवर्गातील लोकांना मिळावा यासाठी अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. शहरातील मित्र नगर आणि पालवण चौक या ठिकाणी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी नगरसेवक विनोद मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी विनोद मुळूक म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेचा ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. बऱ्याच नागरिकांनी हे कार्ड अद्याप काढलेले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान योजना महत्त्वाची आहे, असे देखील नगरसेवक विनोद मुळूक यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत हेल्थ आयडी कार्डमुळे नागरिकांना पाच लाखापर्यंतचे मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. सरकारने ही योजना गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटातील लोकांसाठी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून घेण्याचे आवाहन नगरसेवक विनोद मुळूक यांनी या शिबिर प्रसंगी नागरिकांना केले. यावेळी कदम मॅडम, सुनीता मॅडम, ज्योती शेळके, मस्के मॅडम,पत्रकार नितीन जोगदंड, रोहन गुजर, आनंद शिंनगारे, अमित जोगदंड यांच्यासह शेकडो लाभार्थी नागरिक महिला महिला उपस्थित होते.