शिरूर :  शिरुर पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करीत ७६,२००/- रू. किंमतीचे ३ गावठी बनावटीचे पिस्तुल व १० जिवंत राऊंड गुन्हयात वापरलेल्या वाहनासह जप्त केलेले असून तीन जणांना अटक केली आहे . निखिल एकनाथ चोरे वय २० , विकास बाबाजी चोरे वय २२ वर्ष शुभम सुरेश चोरे वय २० वर्ष, सर्व राहणार डोंगरगण, ता. शिरूर, जि.पुणे अशी अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली आहे .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.३१/१२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांना बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, मध्यप्रदेश येथुन निखिल एकनाथ चोरे रा डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे हा शिरूर एस टी स्टॅड येथे येणार असून त्याचे जवळ १ गावठी बनावटीचे पिस्तुल व ४ राऊंड आहेत, मिळालेल्या माहिरीनुसार पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांनी पथक तयार करून व सापळा रचून शिरूऱ एस.टी. स्टॅड समोरील मोकळया जागेतून निखील चौरे यास ताब्यात घेतले . त्याचे जवळील बॅगमधुन २५,४००/- रू. किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल, ४ जिवंत राउंड व एक निळे रंगाची बॅग असा मुद्ददेमाल जप्त करून आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला . निखील एकनाथ चोरे यांचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्तुल व जिवंत राऊंड उमरटी, मध्यप्रदेश येथुन आणल्याचे सांगितले. त्याच बरोबर विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी देखील त्यांचे कडील फोर्ड कंपनीची एंन्डेवर गाडी नं. एम.एच.१२ एस. एच. ३३४४ यामध्ये उमरटी, मध्यप्रदेश येथुन २ पिस्तुल व ६ राऊंड आणल्याचे सांगितल्याने विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांना ताब्यात घेवुन त्याचे कडे चौकशी करून त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन ५०,८००/- रू. किंमतीचे २ पिस्तुल, ६ जिवंत राऊंड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली वीस लाख रू. किमतीची फोर्ड कंपनीची गाडी ही हस्तगत करण्यात आली आहे या गुन्हात एकण ७६,२००/- रू. कि. गावठी बनावटीचे एकूण ३ पिस्तुल व १० जिवंत राऊंड आरोपी कडून हस्तगत करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, अमोल पन्हाळकर, पोलीस इन्स्पेक्टर सुनिल उगले, एकनाथ पाटील, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, पो.हवा -परशराम सांगळे, पोलीस नाईक नानासाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दिपक पवार यानी केलेली आहे. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस इन्स्पेक्टर एकनाथ पाटील करीत असून तीनही आरोपीना न्यायालयाने ४ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे .