बीड,दि.28 (जिमाका) : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीची आज शुक्रवारी बैठक होणार असून ही बैठक आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत.

            केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरीता "विकसित भारत संकल्प यात्रा २०२४" अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक होणार आहे.

            दुपारी ०३.०० वा. आयुष्मान भारत / महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक होणार आहे. दुपारी ०३.३० वा. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी ०४.०० वा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांची आढावा बैठक आहे. सायं. ०५.०० वा. सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, रुग्ण यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृह येथे श्री शेटे यांचा राखीव वेळ असणार आहे.