बीड, (प्रतिनिधी)- येथील बसस्थानकात अनोळखी इसम वय अंदाजे ६५ वर्षे आजारी आढळुन आला होता. त्यास १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दि.२६ डिसेंबर रोजी सदर अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. अद्यापर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. उंची १६६ से.मी. वर्ण काळा, केस काळे पांढरे व दाढी वाढलेली, नाक सरळ, अंगात पिवळ्या रंगाचा फुल शर्ट व फुल पॅन्ट, बांधा सडपातळ अशा वर्णनाचा सोबतच्या छायाचित्रातील व्यक्ती विषयी कोणाला माहिती असल्यास त्यांनी शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस हवालदार गायकवाड मो.नं.८८३०६६३८३८ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.