मातोश्री महिला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने औद्योगिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा अभ्यास दौरा जिमा टेक्स ( टेक्स्टाईल प्लांट व बायो प्लांट), वनी येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी इंडस्ट्री मधील विविध विभागाला भेट देत तेथील कामकाज जाणून घेतले. इंडस्ट्री मधील सर्व विभागातील सर्व काम व प्रक्रिया विद्यार्थिनींनी समजून घेतल्या तसेच अनेक प्रश्नांच्या माध्यमातून शंकांचे निरासरण करून घेतले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला होता. याप्रसंगी इंडस्ट्रियल व्हिजिटचे समन्वयक प्रा.अमित दीक्षित, डॉ. सपना जयस्वाल, प्रा. वैशाली तडस प्रा. निकिता चंदनखेडे, प्रा. वैष्णवी उगले ,प्रा.निकिता पिंपळशेंडे, प्रा. गणेश लाडे यांची उपस्थिती होती अभ्यास दौऱ्याला 52  विद्यार्थिनींची उपस्थिती होती.