शिरूर - येथील आर एम धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये  सांताक्लॉज व त्याने दिलेल्या चॉकलेटमुळे चिमुकले विद्यार्थी एकदम उल्हासित  व आनंदी झाले. उल्हासित वातावरणात ख्रिसमस साजरा करण्यात आला.

 लहान मुलांना सांताक्लॉजचे आकर्षण असते.यामुळे ख्रिसमस साजरा करण्याच्या निमित्ताने प्री प्रायमरीतील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले.अचानक  सांताक्लॉज तेथे अवतरल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर  आनंदाची भावना प्रकटली . सांताक्लॉज ने मुलाना  चॉकलेट दिली . मुलांच्यावर  सण उत्सवाचे संस्कार घडावेत या उद्देशाने मुख्याध्यापिका  अश्विनी घारु  यांच्या संकल्पनेतून ख्रिसमस साजरा करण्यात आला.यासाठी  स्कूल मध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.स्कूलचे चेअरमन शिरीष बरमेचा , पर्यवेक्षिका स्नेहल शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल  बोरा , सचिव नंदकुमार निकम , धरमचंद  फुलफगर , राजेंद्र भटेवरा  , शिरीष गादिया  यांनीही  विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.