डॉक्टर त्यांच्या कार्यातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे मोलाचे काम करत असतात, शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेसह अनेक समाजपयोगी कार्ये केले जात असल्याची बाब कौतुकास्पद असून माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर ता. शिरुर येथील माऊलीनाथ हॉस्पिटल येथे राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतीच भेट दिली, माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. दिपक पाटील, डॉ. मंजिरी सोनवणे, डॉ. सायली तापकीर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर थेऊरकर, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, उद्योजक प्रशांत सासवडे, साईराम सातव यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माऊलीनाथ हॉस्पिटल हे त्यांच्या टीमच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना अनेक समाजपयोगी कामे देखील केली जात आहे, ग्रामीण भागातील महत्वाची असलेली सर्व सुविधा सध्या येथे उपलब्ध करण्यात आल्याची बाब निच्छितच चांगली आहे, यापूर्वी कोरोना काळामध्ये अनेक नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना देखील येथे मृत्युच्या धाडेतून बाहेर काढण्यात आले तर एका युवतीच्या पोटामध्ये गेलेली सुई डॉ. पवन सोनवणे व डॉ. अजिंक्य तापकीर यांनी बाहेर काढून राज्यात आपल्या सेवेचा ठसा उमटविला असल्याचे सांगत माऊलीनाथ हॉस्पिटलच्या टीमचे एकनाथ खडसे यांनी कौतुक केले. यावेळी माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं