शिरुर - राष्ट्रीय कर्मचारी सेना व वर्तमान आदिवासी विकास यांचा वतीने शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर येथील पदमश्री सिंधूताई सपकाळ यांच्या ' द मदर ग्लोबल फाउंडौशन ' मधील विद्यार्थ्याना टी शर्ट व मिठाईचे वाटप करण्यात आले . यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेना कार्याध्यक्ष माधव मुंडे , राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सचिव देवराम गरुड , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,एस . टी कर्मचारी संघटनेचे नेते पप्पू कांडेकर , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , ॲड . सतीश गवारी , ड्स्म्बेनाला गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संतोष शेजवळ , स्वप्नील देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते . संजय बारवकर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . देवराम गरुड यांनी किरण पावसकर यांचा जीवनकार्यचा परिचय करुन दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मुंडे यांनी केले .त्यात त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेत वाढदिवसाचा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले . आभार पप्पू कांडेकर यांनी मानले .