शिवव्याख्याते संदीप औताडे पाटील मावळा सन्मान पुरस्काराने सन्मानित

पाचोड (विजय चिडे) फिरंगोजी शिंदे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य संचलित,मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी शिवछत्रपतींचा ऐतिहासिक वारसा जतन,संवर्धन तसेच ऐतिहासिक विचारांचा प्रचार प्रसार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मावळा सन्मान पुरस्काराचा सन्मान सोहळा किल्ले तोरणा व राजगड मोहिमेदरम्यान किल्ले राजगड पायथ्याला पार्वती सोमवारी (दि.११)रोजी मंगल कार्यालयात हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.

शिवव्याख्याते संदीप औताडे हे प्लास्टिक मुक्त रायगड,दुर्गस्वच्छता मोहिमा, तसेच अखंडितपणे शिवविचारांचा प्रचार प्रसार केला या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शिव विचारांचा प्रसार या कार्याबद्दल 2023 "मावळा सन्मान पुरस्कारने" सन्मानित करण्यात आले.छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यामध्ये लढणाऱ्या प्रत्येक शूर योद्धा ला मावळा हा सर्व समावेशक शब्द देऊन एक वेगळी अशी पदवीच बहाल केली होती आणि ती एक जबरदस्त शाबासकी सुद्धा होती अगदी तसाच विचार पुढे चालू ठेवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाज घटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस मावळा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या संस्थेची संस्थापक वस्ताद प्रमोद पाटील हे स्वतः शिवकालीन शस्त्र बनवणे,शिवकालीन युद्ध कला यांचा महाराष्ट्रभर प्रचार प्रसार करतात, त्यांच्या संकल्पनेतून शिवकार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार म्हणजे एक शाबासकीच! या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातून दुर्गप्रेमी शेकडोच्या संख्येने या सन्मान सोहळ्यास उपस्थित होते, फीरंगोजी शिंदे सामाजिक संस्था ही अशी एक संस्था आहे जी संस्था पुरस्काराचे सन्मान सोहळे इतिहासाच्या समरभूमीत पार पाडत असते. इतिहासावर काम करणारे व्यक्तिमत्त्वाचा सन्मान सुद्धा इतिहास भूमीतच व्हायला पाहिजे हा त्यांचा मानस आहेम्णून किल्ले तोरणा व दुर्गराज राजगड या मोहिमे दरम्यान या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोबतच शिवकालीन युद्ध कलेचे चित्त थरारक प्रात्यक्षिके झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विविध पदांची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. समारोपामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटील यांनी सांगितले की शेवटच्या श्वासापर्यंत आमचा हा मर्दानी आखाडा हा इतिहासाचा वेध घेत राहील, जे-जे ऐतिहासिक कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य करतात त्यांच्यासोबत संस्था सर्व ताकतीने उभ राहील,छत्रपती शिवरायांनी ज्या शस्त्रांच्या जोरावर मोठ्या मोठ्या बादशाही सत्तांना लोळवलं त्या शिवकालीन शस्त्रांचा प्रचार प्रसार करण्याचं निरंतर व्रत आम्ही पार पाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेवटच्या माणसाला शिवकालीन शस्त्रांची माहिती करून देत राहू.या सन्मान सोहळ्यास छत्रपती संभाजी नगर,सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर,सातारा,पुणे अशा विविध जिल्ह्यातून शेकडो इतिहास प्रेमी या मोहिमेत सहभागी होते.