शिरुर - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केलेल्या आरोपी पतीस पोलीसांनी जेरबंद केले आहे .

   खून झालेल्या महिलेचे नाव सविता अशोक रंधवे वय -४५   मूळ रानेवासा फाटा ,ता नेवासा जि नगर  . सध्या राहणार कारेगाव , ता शिरुर , जि पुणे असे आहे. तर जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव अशोक भीमराव रंधवे मूळ रा. नेवासाफाटा ता नेवासा जि नगर सध्या राहणार - कारेगाव , ता शिरुर जि पुणे असे आहे .

    याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव, येथील विठ्ठल मंदिरा जवळील देशमुख यांचे ईमारतीच्या वरच्या खोलीमध्ये अशोक भिमराव रंधवे व त्यांची पत्नी सविता अशोक रंधवे वय 45 वर्षे हे राहत होते. अशोक भिमराव रंधवे यांनी पत्नी सविता अशोक रंधवे वय 45 वर्षे हीचा दि. ७ डिसेंबर 2023 रोजी चारित्र्याचा संशय घेउन खुन केल्याची फिर्याद सचिन दिलीप कातकाडे यांनी केली होती . फिर्यादीवरुन अशोक भिमराव रंधवे यांचे विरुध्द रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशोक भिमराव रंधवे याने त्याचे जावई सचिन दिलीप कातकाडे यांना फोन करून सविता अशोक रंधवे यांचा मर्डर केल्याचे कळविल्यावर कातकाडे यांनी सदरची माहीती पोलीस स्टेशनला कळवली . माहिती मिळताच पोलीस निरिक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, शिवाजी मुंढे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार संदिप जगदाळे, पोलीस हवालदार कल्पेश राखोंडे, कॉन्स्टेबल विजय शिंदे, कॉन्स्टेबल प्रतिक खरवस यांनी घटनास्थळी भेट दिली असता सदर रुम मध्ये सविता अशोक रंधवे यांचा मृतदेह पोलीसांना मिळुन आला. यातील आरोपी अशोक भिमराव रंधवे हा खुन केल्यानंतर फरार झाला होता अशोक भिमराव रंधवे त्याचा शोध घेण्याबाबत पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सुचना दिल्या आरोपी हा शिरुर शहरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांना मिळाल्या नंतर ते स्वंत : अनिल मोरडे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, पांडुरंग साबळे, विजय शिंदे, यांनी संपूर्ण शिरुर शहरात आरोपीचा शोध घेतला तसेच तांत्रिक विश्लेषन करून शिरुर शहरातील सी टि बोरा कॉलेज समोरील मोकळ्या जागेतून आरोपी अशोक भिमराव रंधवे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी आधीक तपास सहय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत .