सिध्देश्वर मठपती-नांदेड जिल्हा प्रतनिधी 

      

        मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगाना या चार राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांच्या बळावर भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर अतूट विश्वास दाखवत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे .या सर्व बहाद्दर मतदारांचे आभार शिवराज पाटील गाडीवान जिल्हा प्रवक्ता भारतीय जनता पक्ष नांदेड यांच्या वतीने मानले आहेत. चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अत्यंत साचेबद्ध पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबवून जनसामान्याच्या जीवावर तीन राज्यांमध्ये निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर तेलंगणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मतदानाचा टक्काही वाढलेला आहे .त्यामुळे तेलंगानातील जनतेचा येणारा कौल सुद्धा भाजपच्याच वतीने असणार असे हि शिवराज पाटील गाडीवान यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. नरेंद्र भाई मोदी हीच विकासाची गॅरंटी हा फार्मूला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठरला होता आणि भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे व उद्दिष्टे जनसामान्य लोकापर्यंत पोहोचवणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांनी तन-मन धनाने झोकून देऊन काम केल्यामुळेच या तीन राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाचे बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्ना प्रमुख या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून ऐतिहासिक असा विजय मिळवत एक हाती सत्ता भाजपाला मिळवून दिली आहे या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार हि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ता शिवराज पाटील गाडीवान यांनी व्यक्त केले. या तिन्ही राज्याच्या विजयाचं श्रेय येथील जनता, भारतीय जनता पक्षावर त्यांच्या ध्येय धोरणावर दाखवलेला विश्वास आहे आणि इथल्या कार्यकर्त्यांची अतूट अशी मेहनत आहे ही निवडणूक लोकसभेची सेमी फायनल होती आणि ती भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगडच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला . मतदारांनी आशीर्वाद दिल्याबद्दल सुद्धा सर्व बहाद्दर मतदारांचे आभार शिवराज पाटील गाडीवान यांनी मानले आहेत.