शिरुर - शिरुर शहर आणि परिसरात वीजेच्या कडकडासह मुसळधार पाउसाच्या सरी बरसला .टाकळी हाजी बेट भागात वादळी वा -यासह गारांच्या पाउस पडला . आज सकाळ पासून शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता सायकांळी काही वेळ पाउसाने हजेरी लावली परंतु रात्री पावणे बाराचा सुमारास वीजेचा कडकडासह मुसळधार पाउस बरसला . त्यानंतर शहराचा वीजपुरवठा ही खंडित झाला . टाकळी हाजी परिसरात झालेल्या गारपीटच्या पाउसाने शेतक-यांचा डाळिंबाचा बागा ,कांदा रोपे व भाजीपाला पीकांचे मोठे नूकसान झाले आहे .