शिरुर - मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस आधिकारी ,कर्मचा-यांसह बळी पडलेल्या नागरिकाना वीर जवान अभिवादन समिती शिरुरच्या वतीने हुतात्मा समारकाजवळ पुष्पचक्र अर्पण करुन मेणबत्त्या पेटवून श्रध्दंजली वाहण्यात आली व अभिवादन करण्यात आले .  ' हुतात्मा शहीद जवान अमर रहे' व 'भारत माता कि जय 'च्या घोषणा देण्यात आल्या .     यावेळी राष्ट्रपती पोलीस पुरस्कार प्राप्त हिंगोलीचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके ,पोलीस निरीक्षक संजय जगताप ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव , पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले ,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , प्राचार्य डॉ. समीर ओंकार ,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड प्रदीप बारवकर ,संतोष शितोळे , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , मनसेचे शहरप्रमुख ॲड. आदित्य मैड , माजी शहरप्रमुख संदिप कडेकर , अविनाश घोगरे ,जनहित कक्ष आघाडीचे रवींद्र लेंडे ,शिवसेनेचे खुशाल गाडे , सामाजिक कार्यकर्ते अस्लम शेख ,यशवंत वाटमारे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , मराठा समाज संघचे विश्वस्त सागर नरवडे , रामभाउ इंगळे , जितेंद्र खांडरे , रवि आढाव , रंगनाथ भालेराव ,सेवानिवृत्त शासकिय आधिकारी सुनील करळे , धनंजय धुमाळ , अशोक काळे , नितीन गायकवाड , नोटरी विलास खांडरे , , रोशन बाफना ,विजय गायकवाड ,माजी उपसरपंच गणेश खोले, अजिम सय्यद आदी यावेळी उपस्थित होते . पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांनी शहिद पोलीस आधिकारी हेमंत करकरे यांच्या समवेत केलेल्या कामांच्या आठवणी सांगितल्या . पोलीस निरीक्षक संजय जगताप यावेळी म्हणाले की अतिरेक्यांनी मुंबई वर हल्ला केला. या हल्लाच्या विरोधात एकदिलाने पोलीस आधिकारी , सैनिक व नागरिक यांनी लढुन हा  हल्ला परतवून लावला .यात लढताना काही जणाना हौतात्म पत्कारावे लागले.

महिबुब सय्यद म्हणाले की मागील १४ वर्षापासुन शिरुर शहरात हुतात्मा वीर जवान अभिवादन समितीचा वतीने २६/११च्या दहशतवादी ह्ल्ल्यात हुतात्मा झालेल्याना अभिवादन करण्यात येते . माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , माजी नगरसेवक रवींद्र धनक , प्राचार्य डॉ . समीर ओंकार , आदीची भाषणे यावेळी झाली. आभार माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर यांनी मानले .