शिरुर - श्री. संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण शिरुर व विठ्ठल नगर मित्र मंडळ यांचा वतीने वर्धापन दिन व कार्तिकी एकादशी निमित्त गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी ध्यान मंदिर, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, विठ्ठलनगर, शिरूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी 6.30 वाजता महाभिषेक करण्यात येणार असु ८ वाजता वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांचा हस्ते महाआरती करण्यात येणार आहे . दुपारी २ वाजता ध्यान मंदिर हरिपाठ भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत .संध्याकाळी 4 ते 5 वा. हरिपाठ होणार असून सायं. ६ वाजता मुख्याधिकारी, शिरुर नगर परिषद स्मिता प्रदीप काळे यांचा हस्ते महाआरती होणार असून खिचडी वाटप करण्यात येणार आहे .ह.भ.प.कविराज महाराज झावरे यांचे किर्तन सायं. ६.०० वाजता होणार असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .