शिरुर : सोमवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी खराडी-चंदननगर पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित सकल मराठा समाज यांच्या सभेच्या अनुषंगाने पुणे नगर रोडवरील वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशात  म्हटले आहे की   खराडी, चंदननगर, येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड या ठिकाणी दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता सकल मराठा समाज यांची सभा होणार असून या सभेकरीता मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. सदर सभेकरीता मोठ्या प्रमाणावर नागरीक उपस्थित राहण्याची शक्यता असून, सभेकरीता येणाऱ्या नागरीकांच्या वाहनांमुळे पुणे-नगर रोडवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच दिपावली सणाच्या सुटया संपल्यामुळे गावावरुन परत येणा-या नागरिकांच्या वाहनांमुळेही पुणे-नगर रोडवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर बाजूकडून पुणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने शिक्रापूर येथून चाकण ,भोसरी मार्गे  पुणे मुंबईकडे अशी वळविण्यात येणार आहे . खराडी, चंदननगर, येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड या ठिकाणी सकल मराठा समाजाचे सभेच्या निमित्ताने दि.२०/११/२०२३ रोजी सकाळी ०६:०० ते. २४:०० वा. पर्यंत वाहतुक कोंडी टाळण्याचे दृष्टीने पुणे नगर रोडवरील जड- अवजड वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिला आहे . अहमदनगर बाजूकडून पुणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरी मार्गे पुणे. मुंबईकडे अशी जातील, सदर आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदा. पोलीस, रुग्णवाहिका , फायर ब्रिगेड, पेट्रोल- डिझेल टॅकर्स,पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस यांना लागू राहणार नाही .