शिरुर - हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील विविध राजकिय पक्ष संघटना यांचा वतीने अभिवादन करण्यात आले . शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालया जवळ हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी माजी नगरसेवक मंगेश खांडरे , सचिन धाडीवाल , मुजफ्फर कुरेशी ,राजेंद्र चोपडा , संदिप गायकवाड सुनील चौधरी , संतोष पवार , अनिल लोंढे ,महादेव कडाळे ,माणिक गव्हाणे , बाबूराव पाचंगे ,विजय नरके ,राजू शेख, संजय कर्डिले बाळासाहेब ढेरंगे , गणेश पाचर्णे ,खुशाल गाडे , मितेश गादिया आदी उपस्थित होते . यावेळी प्रास्ताविक शहरप्रमुख संजय देशमुख यांनी केले त्यात ते म्हणाले आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्याना लढ्याचे बळ दिले. त्याचे योगदान फार मोठे आहे . आगामी काळात शिवसेना कार्यकारीप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येईल असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला . शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार ,माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी ,पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या विजया टेमगिरे , माजी सरपंच प्रकाश थोरात , माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड आदीची भाषणे यावेळी झाली . आभार सुनील चौधरी यांनी मानले .