माळशिरस तालुक्यातून जात असणाऱ्या नीरा उजवा व निरा डावा या कालव्यासोबत बंद नलिका करून पंढरपूर व सांगोला तालुक्याला पाणीपुरवठा करावा अशी मागणी अकलूज येथील विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
दरम्यान या मागणीला स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत असून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवराज पुकळे यांनी याप्रकरणी विरोध दर्शविला आहे.