शिरुर :  भीम छावा संघटना,शिरूर यांच्या वतीने आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229 व्या जयंती निमित्त अभिवादन सभा व दिव्यांग  बांधवांना किराणा किट चे वाटप करण्यात आले .

 पुणे नगर रस्त्यावरील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात हा कार्यक्रम झाला . यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे नेते पंडित ससाणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, मातंग एकता आंदोलनचे अध्यक्ष सतीश बागवे लहूजी शक्ती सेनेचे बंटी जोगदंड,प्रहार संघटनेचे पिनू सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते- फिरोज भाई शेख ,सोनू काळोखे, गोरख ससाने,सागर पंडित,विशाल ससाणे,रुपेश गुंजाळ, विशाल साबळे,पप्पू साठे,प्रमोद लोखंडे, विनोद घाडगे, विशाल मोरे आदी य उपस्थित होते .

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका मायाताई गायकवाड , माजी नगरसेवक विनोद भालेराव अविनाश शिंदे, आदी उपस्थित होते . रवींद्र धनक यांनी आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत या जीवनकार्याच्या युवकानी अभ्यास करावा असे आवाहन केले . कार्यक्रमाचे आयोजन आयोजक भीम छाव्व्व संघटेनेचे तालुकाध्यक्ष चेतन साठे , प्रकाश डंबाळे, कैलास बागवे,आदीनी केले होते .