शिरुर -सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर्स पुरस्कार प्राप्त झाला आहे .

यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट मुंबई येथे प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर्स २०२३ पहिला टप्पा गौरव सोहळा पार पडला. या गौरव सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील पहिल्या १०० शाळांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या १०० शाळांमधून फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त असलेली दिवटे पाटील पब्लिक स्कूल,सुपा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी शाळा ठरली आहे. त्यानिमित्ताने दिवटे पाटील पब्लिक स्कूल चे प्राचार्य एस. डी. पळसकर यांची प्रोजेक्ट लेट्स चेंज या राज्य समितीत निवड करण्यात आली. त्यांचा  सत्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व  चित्रपट अभिनेते प्रेमजी चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आला.

  प्राचार्य एस. डी. पळसकर , शाळा समन्वयक वैभव बारगुजे  व किरण कौठाळे , जिल्हा समन्वयक मंगेश भोरसे, उपशिक्षणाधिकारी देवकर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी शाळा म्हणून देखील  सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अँड. शहाजीराव दिवटे यांनी  विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे .