शिरुर: गेल्या अनेक महिन्याची शिरुरकरांची पीएमपीएमएल बसची  प्रतिक्षा संपुष्टात आली असून ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर शिरुरकराना पीएमपीएमएलचे गिफ्ट मिळाले असून शुक्रवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी वाघोली व कारेगाव हून शिरुरला बस आली . शिरुर हे पुणे अहमदनगर महामार्गावरील महत्वाचे शहर आहे . मोठ्या झपाट्याने शिरुर चे शहरात रुपांतर होत आहे .त्याच बरोबर शिरुर हे शिक्षणाचे हब असून हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने शिरुर ,श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातुन शहरात येत असतात . शिरुर शहरातील बाजारपेठ ही महत्वाची असून कोट्यावधी रुपयाची उलाढाल बाजरपेठेत होत असते. सभोतलाच्या तालुक्यातील अनेक जण शिक्षण रोजगार व व्यवसायानिमित्त शिरुर मध्ये वास्तवास आहे . साहजिकच शिरुरची वाढ दिवसागणिक होत आहे . मोठ मोठे गृहप्रकल्प व विविध शिक्षण संस्थाचे जाळे , राष्ट्रीयकृत बॅका , खाजगी ,सहकारी ,पतसंस्था व मल्टीस्टेट संस्था शहरात मोठ्या संख्येने आहेत .नामाकिंत हॉस्पिट्ल व तज्ञ डॉक्टर शहरात आहे . काही वर्षापूर्वी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयही शहरात कार्यांन्वित झाले आहे . शिरुर शहरा पासुन जवळ कारेगाव रांजणगाव औद्योगिक वसाहत असून शिरुर परिसरातून वसाहतीत रोजगार व व्यवसायानिमित्त जाणा-यांची संख्या मोठी आहे . यात महिला कामगारांची संख्या ही मोठी आहे . कर्डे घाटात ही औद्योगिकरण जोर पकडत आहे .सुपा एमआयडीसी ही तासाभराच्या अंतरावर आहे. वरील सर्व बाबीन मुळे शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण शहरीकरण होत असून शिक्षण व्यवसाय रोजगार व अन्य कामानिमित्त पुणे परिसर व पुणे नगर रस्त्यावरील विविध गावात जा ये करणा-यांची संख्या मोठी आहे .पुण्यासाठी जाण्या करिता आता एस टी बस बरोबरच पीएमपीएमएलच्या बससेवेच्या सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे . शिरुर मधून पुणे ( वाघोली ) पर्यत बससेवा उपलब्ध व्हावी याकरिता मागील महिन्यापासुन सातत्याने मागणी करण्यात येत होती सध्या वाघोली पासुन कारेगाव पर्यत बससेवा सुरु होती त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी पीएमपीएमएलने जायचे झाल्यास शिरूर हून कारेगाव पर्यत यावे लागत होते त्यामुळे कारेगाव पर्यतची बससेवेचा विस्तार शिरुर पर्यत करावा अशी मागणी होत होती .ती मागणी पूर्ण झाली असून उ शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी पीएमपीएल बस शिरुर शहरात आली . विविध संस्था व संघटना यांच्या वतीने बसचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले . आमदार ॲड .अशोक पवार यांनी वाघोली पासून शिरुर पर्यत बसप्रवास करीत बससेवेचे स्वागत केले . बससेवा सुरु होण्यातील प्रवास ही त्यांनी स्वागतप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विशद केला . वाघोली बस डेपो मॅनेजर सोमनाथ वाघोले म्हणाले की गेल्या काही दिवसापासून शिरुर पर्यत बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती . त्यानुसार बससेवा सुरु करण्यात आली आहे. शिरुर ते कारेगाव २० रु तिकिट असून वाघोली पर्यत ७५ रु . आहे. शिरुर बायपास ते शासकीय विश्रामगृहा पर्यत सहा थांबे आहेत . त्याच बरोबर दैनदिन पास ही उपलब्ध करुन देण्यात येतील व भविष्यात ही बसफे-या वाढविण्यात येणार असल्याचे वाघोले म्हणाले . यावेळी बसचे चालक व वाहक संतोष लक्ष्मण वाघमारे ,भाउसाहेब मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला . कारेगाव १६ त१७ शिरुर पर्यत थांबे आहेत . यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड .सुभाष पवार , माजी नगरसेवक नीलेश लंटाबळे , सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात , रवींद्र सानप आदीची स्वागतपर भाषणे झाली . यावेळी प्रा. दीपक गायकवाड ,माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , प्राचार्य अमोल शहा, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर , नीलेश वाळूंज ,मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर , तुषार कुटे आदी यावेळी उपस्थित होते . पीएमपीएलच्या येण्याने शिरुरच्या विकासाच्या व प्रगतीच्या दृष्टीने मोठे पाउल पडल्याची भावना व्यक्त केली जात आहे .