चापानेर दि.8   आज इंदिरानगर,चिंचखेडा खुर्द शाळेमध्ये दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांची आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन गृहपाठ करण्यासाठी प्रिंटेड अभ्यास पुस्तिका वाटप करण्यात आल्या. सदरील कार्यशाळेस गावातील ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक वृंद उपस्थित होते.