शिरूर -येथील घोडथडी जत्रेमध्ये वाघ प्रोफेशनल अकॅडमी चे विद्यार्थी उत्कर्षा सातभाई, सुदर्शन जगदाळे, स्नेहा देशमुख, समर्थ नरवडे, मल्हार बारवकर, वेदांत वारे, ओम पुजारी, दर्शन कोरचे, शिवप्रसाद खेडकर या विद्यार्थ्यांनी दिवाळी च्या विविध प्रकारच्या वस्तूंचा स्टॉल लावला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, साबण, फराळाचे पदार्थ, तांदुळाच्या पिठाचे चॉकलेट, स्ट्रॉबेरी बाईट्स, डायरी, बॉटल आर्ट अशा अनेक नवनवीन वस्तू, कलाकृती आणि पदार्थांचा समावेश होता विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, स्वतःच्या पायावर उभे रहण्याची प्रेरणा मिळावी, वेळेचे नियोजन, प्रसंगावधान अशा गुणांचा विकास होण्याच्या हेतूने या स्टॅालची उभारणी करण्यात आली होती. याला शिरूरकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या सर्व वस्तू विकत घेतल्या. कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर सुप्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई यांनी देखील स्टॉल ला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्या नंतर विद्यार्थ्यांनी न विसरता सर्व पोलिसांना दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. ही संकल्पाना त्याला मार्गदर्शन वाघ प्रोफेशनल अकॅडमी चे चैतन्य वाघ  व नम्रता कटारिया यांचे होते.