शिरुर - फोन वरुन  मालाची ऑर्डर देवुन फसवणुक करणा-यास पोलीसांनी जेरबंद केले आहे .दिपक गणेश गुगळे वय 23 वर्षे, रा. वडुले खुर्द, ता. शेवगाव, जि. अ.नगर, व शाहबाज जुबेर शेख वय 34 वर्षे, रा. बाजार भिंगार, ता. जि.अ.नगर यांना अटक करण्यात आली आहे . याबबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगावचे हद्दीतील फलकेमळा येथून दि. ३० ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01.00 वा.च्या सुमारास ऋत्विक मनोहर गिरीधर, व्यवसाय- बँटरी दुकान, रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे हे त्यांना एका अनोळखी व्यक्तीने चार बॅट-यांची ऑर्डर दिल्याने सदरची ऑर्डर घेवुन कारेगाव येथे जात होते. त्यावेळी त्यांना एक पांढ-या रंगाच्या ईरटिका गाडीतुन दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांना दमदाटी, मारहाण करण्याची धमकी देवुन त्यांचेकडील 77,700 /रु. किमतीच्या बॅट-या जबरदस्तीने चोरुन नेल्या होत्या. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दोन अनोळखी व्यक्तीविरुध्द दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक महेश ढवण यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सुचना दिल्याने तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी न1) दिपक गणेश गुगळे वय 23 वर्षे, रा. वडुले खुर्द, ता. शेवगाव, जि. अ.नगर, (2) शाहबाज जुबेर शेख वय 34 वर्षे, रा. बाजार भिंगार, ता. जि.अ.नगर यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे कामी अटक केली.आरोपीनी पोलीस कस्टडी दरम्यान सदर गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन चोरलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली ईरटिगा गाडी क्र. MH -12 जीयू 6597 ही जप्त केली आहे. दिपक गुगळे याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने जामखेड, भिंगार, कोतवाली पोलीस स्टेशन, जि. अ.नगर हद्दीमध्ये अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्या गुन्हयांबाबत तपास केला असता असे निष्पन्न झाले की, आरोपी दिपक गुगळे हा "जस्ट डायल" वरती फोन करून वेगवेगळ्या परिसरातील नामांकित बँटरी, कपडे, सिलाई मशिन, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर प्राप्त करून त्यावरून संबंधित दुकानदारांना फोन करून सांगायचा की, मी अहमदनगर येथील दानशुर  असुन मला अनाथ आश्रम, वृध्दा आश्रम यांना कपडे, बॅटरी, सिलाई मशिन , तेलाचे डब्बे असे दानधर्मासाठी पाहिजे आहेत. असे सांगुन त्यांचेकडुन मालाची ऑर्डर एखाद्या पत्यावर पाठवुन देण्यासाठी सांगत होता. दुकानदार देखील मोठी पार्टी मिळाल्याच्या आनंदात ऑर्डर प्रमाणे माल गाडीमध्ये भरून पाठवुन द्यायचे त्यानंतर आरोपी गुगळे हा दुकानदाराकडुन गाडी चालकाचा नंबर घेवुन त्यास दिलेल्या पत्याच्या अलिकडेच 80 टक्के माल खाली करून 20 टक्के माल पुढे दुस-या पत्यावर घेवुन ये, तेथे आल्यावर सर्व पैसे देतो असे सांगायचा, त्यानंतर आरोपी गुगळे हा ताब्यात आलेल्या 80 टक्के मुद्देमालासह गायब होवुन फोन बंद करत होता. त्यानंतर गाडी ड्रायव्हर उर्वरीत 20 टक्के मालासह पैसे न घेता परत दुकानात आल्यावर दुकानदाराला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात यायचे. अशा प्रकारे आरोपी गुगळे याने त्याचा साथीदार आरोपीसह एकुन 05 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात रांजणगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक कोतवाली पोलीस ठाण्यातील २ व जामखेड व भिंगार पोलीस ठाण्यातील गुन्हाचा समावेश आहे .या पाच गुन्हातील १० लाख ३५ हजार ८०० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीसांनी सांगितले . सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर यशवंत गवारी , यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक श अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, विलास आंबेकर, तेजस रासकर, माणिक काळकुटे, संतोष औटी व वैजनाथ नागरगोजे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  सुहास रोकडे करीत आहेत.