शिरुर : ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या काळावधीत शिरुर शहरातील बसस्थानका मागील रयत शाळेच्या मैदानावर वर घोडथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गौरी घावटे , प्रियंका धोत्रे व वैशाली रत्नपारखी यांनी दिली आहे . घोडथडी जत्रे मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मैफील असणार आहे . त्याच बरोबर बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तूचे प्रदर्शन व विक्री, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू स्टॉल ,गोमूत्रपासून बनविलेल्या विविध वस्तू , हस्तकला - विविध वस्तू स्टॉल विविध कडधान्ये, भरडधान्ये स्टॉल ,बुकस्टॉल, शूज स्टॉल, विविध गृहोपयोगी वस्तू स्टॉल ,ऊसाची कुल्फी, विविध प्रकारचे कोल्ड्रींक्स, आईस्क्रिम, लस्सी दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्टॉल व खरेदीवर विशेष सवलत असणार आहे . विशेष मुलांनी बनविलेल्या आकर्षक वस्तू , मातीपासून बनविलेली भांडी-कुंभारकाम स्टॉल , नैसर्गिक, केमिकल विरहित मध, गुळ गवतापासून बनविलेल्या चटई,होममेड ज्वेलरी विविध प्रकारचे मसाले ,शालेय वस्तू, साड्या, रेडिमेड ड्रेस, रेडिमेड ब्लाऊज स्टॉल, अम्युझमेंट पार्क, विविध प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थ स्टॉल असणार असुन घोडथडीची वेळ - सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यत असणार आहे . शिरुरकरांनी मोठ्या संख्येने घोडथडीस भेट द्यावी असे आवाहन गौरी घावटे , वैशाली रत्नपारखी , प्रियंका धोत्रे यांनी केले आहे .