परवेज बागवान यांची बिनविरोध ग्रा.पं. सदस्य निवड
पाचोड (विजय चिडे)पाचोड ता.पैठण ग्रामपंचायत सदस्य रहीम बागवान यांचे मागील काही महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडून पोट निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.या पोटनिवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली परवेज बागवान यांचा एकाच अर्ज दाखल झाला आहे. यावेळी मागील आठवड्यात पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपून गेली आहे.तरी परवेज रहीम बागवान यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने परवेज बागवान यांची पाचोड बूद्रुक ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली असल्याने त्यांचे पालकमंत्री संदीपान भुमरे,जि.प.माजी सभापती विलास भुमरे, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे,पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, उपसरपंच शिवाजी भालसिंगेसह आदी ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले आहे