आपतगाव फाटा येथे तरूणांनी रास्ता रोको ;टायर जाळून सरकारचा निषेध,

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर या तरुणाने आज मराठा समाजाला आरक्षण भेटावे यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्या अंत्यविधी करू नका असे या तरुणाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यानंतर मराठा समाजाचा आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे.

तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे, मयत गणेश काकासाहेब कुबेर या तरुणाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही या मागणीसाठी. 

मराठा समाजाकडूनच धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आपतगाव फाटा येथे रस्ता रोको करून टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

जोपर्यंत जिल्हाधिकारी अपतगाव येथे येणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा मराठा समाजाच्या तरुणाने घेतला

 आहे.