मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथील 28वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या,

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून गणेश काकासाहेब कुबेर असे या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाच नाव आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे एक शालेतील पाटीवर लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.