शिरुर : टाकळी हाजी , ता शिरुर येथील 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिच्या वडिलांच्या मोटार सायकल वरून जात असताना पाठीमागून ट्रक ने धडक दिली त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सिध्दी चंद्रकांत गावडे वय - १७ रा . टाकळी हाजी ,ता .शिरुर , जि .पुणे असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज बुधवार दि २५ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान झाला . सिध्दी ही शिरुर शहरातील ज्ञानगंगा विश्वविद्यालयात इयत्ता अकरावीत ( कॉमर्स ) शिकायला होती . आज सकाळी ती वडिलांन समवेत मोटारसायकल वरुन शिरुरला जाण्यासाठी निघाली असता शिरुर शहरा जवळील रामलिंग जवळ मल्हार पार्क समोर मागुन आलेल्या ट्रक नंबर एम . एच . १४ ई. एम. ८५०५ ने मोटार सायकलला ठोकरले. त्यात सिध्दी ही मरण पावली . यासंदर्भात बाबाजी गावडे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे . ट्रकचालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून आधिक तपास पीएसआय स्नेहल चरापले करीत असल्याचे पोलीसांनी सांगितले . सिध्दी ही गुणी व सालस अशी विद्यार्थिनी होती असे ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचे सीईवो डॉ.नितीन घावटे यांनी सांगितले .