पाचोडमध्ये महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन 

पाचोड/ येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये (दि.२६) येथे महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ .संदीप जगताप हे असणार आहेत तर पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने त्यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण होणार आहे.या कार्यक्रमाचा समारंभ ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष 

 राजू भुमरे,पाचोडचे शिवराज भुमरे त्यांच्याकडुन होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे हे राहतील.या स्पर्धेसाठी महाविद्यालयाची पूर्ण तयारी झालेली आहे. तसेच खेळाडूंसाठी एक वेळचं जेवण महाविद्यालयाकडून देण्यात येईल. स्पर्धेसाठी दोन सुसज्ज मैदा ने तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयाने सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सुरेश नलावडे यांनी केले आहे.