गावठी कट्टासह दोन जिवंत काडतूस सोबत बाळगणारा सराईत आरोपीला गंगापुर पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद ..

छत्रपती संभाजीनगर,

गंगापुर शहरात नवरात्री दांडीयाचे अनुषंगाने गंगापूर पोलिस परिसरात पेट्रालिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, वैजापुर ते गंगापुर हायवे वरती असलेल्या एका हॉटेल मध्ये एक व्यक्ती हा जेवण करण्यासाठी आला असुन त्यांची हालचाल ही संशयास्पद असुन त्याचे कमरेला गावठी कट्टा त्यांने लावलेला आहे.

या माहितीच्या आधारे पोनि.सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकाने तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेवून हॉटेलच्या परिसरात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी हॉटेलच्या बाहेर येतांना एक इसम हा हा सापळ्यातील पथकाला दिसला. त्याची हालचाल हि संशयास्पद दिसुन आल्याने पोलीसांनी त्याचे दिशेने धाव घेतली असता पोलीसांचे हालचाल पाहताच त्याने वैजापुर रोडने अंधाराचा फायदा घेत मांजरी फाटयाचे दिशेन सुसाट वेगात धूम ठोकली. परंतु गंगापुर पोलीसांनी सुध्दा अंधारात त्याचा कसून पळत पाठलाग करून त्याला थोड्याच अंतराव असलेल्या मांजरी फाटयावर शिताफिने पकडले.

यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल कचरू साळुंके तय ३० वर्ष रा. जाधवगल्ली ता. गंगापूर असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक | स्टिलच्या धातुचा काळया रंगाचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस (राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आला आहे. गावठी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आली आहेत.त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे गंगापुर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत.

तसेच नमुद आरोपी हा पोलीसांना दिनांक २७/०८/२०१३ रोजी गंगापुर शहरातील अहिल्यानगर येथील ०३ वर्षीय मुलाचा गावठी कट्यातुन त्याला गोळी लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. यागुन्हयातील मयत मुलाचे वडील राहुल कल्याण राठोड याला सुध्दा याच आरोपीने गावठी कट्टा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नमुद गुन्हयातील भादंवी कलम ३०४ सह ३,७,२४ भारतीय हत्यार कायद्यान्वये दाखल गुन्हयात गंगापूर पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचे विरुद्ध आतापर्यंत अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे या सारखे गंगापुर व श्रीरामपूर येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर चार्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापुर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, श्री दिपक औटे, श्री. शकील शेख पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, तेन्सिंग राठोड, विजय नागरे, अजित नागलोत, राहुल वडमारे, मनोज नवले. बाबासाहेब खाडे यांनी केली आहे.