शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित ग्रंथालय, मुक्तद्वार वाचनालयाचे राम आळी येथील महात्मा गांधी रस्त्यावरील शिरुर नगरपालिकेच्या ग्रंथालय इमारतीमधील संकुलात स्थलांतर लोकार्पण सोहळा सोमवार दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. होणार असल्याची माहिती रवींद्र धनक यांनी दिली . मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम होणार असुन यावेळी माजी नगराध्यक्ष व उद्योगपती प्रकाश धारीवाल ,पोलीस निरीक्षक संजय जगताप उपस्थित राहणार आहेत .