शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरातील ज्येष्ठ्य वैद्यकीय व्यावसायिक व माजी नगरसेवक डॉ .बी . बी. पाटील वय -९२ वर्ष यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात पत्नी ,२ मुले ,२ विवाहित मुली सूना नातवंडे असा परीवार आहे . पाटील हे शहरातील प्रसिध्द असे डॉक्टर होते त्याच्या शहरातील रामआळीत दवाखाना होता .त्याच बरोबर सन १९८५ ते १९९२ या काळावधीत ते शिरुर नगरपरिषदेत नगरसेवक होते . डॉ. अजय पाटील व व्यवसायिक अमर पाटील यांचे ते वडिल होत . पाटील यांच्या अंत्यविधी आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी  दुपारी १ वाजता  अमरधाम स्मशानभूमी  शिरुर  येथे होणार आहे . 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद आयुष्यभर जपणारे आणि सचोटी ,प्रामाणिकपणा रुग्णाप्रति जिव्हाळा असणारे माजी नगरसेवक व सर्वसामान्याचे डॉक्टर बी . बी . पाटील हे शहरातील वंदनीय व्यक्तिमत्व हरपले अश्या शब्दांत अनेकांनी डॉ .पाटील यांना आदरांजली अर्पण केली .